महा आवाज News

आटपाडी तहसील सागर ढवळे यांच्या कामकाजात एकाच दिवसात 96 सूनावण्या .

लाईटचा पत्ता नाही, मोबाईल टॉर्च प्रकाशात सुनावण्या, तालुक्यात प्रथमच सर्वात जास्त सुनावण्या.

 प्रतिनिधी: सुधीर पाटील
आटपाडी

आटपाडी:मगंळवार दि.१९ मगंळवार रोजी आटपाडी तहसील कार्यालय मध्ये दुपारी दोन ते सायंकाळी आठ पर्यंत 96 सूनावण्या घेण्यात आल्या,
यामध्ये प्रामुख्याने आर,टी,एस जमीन व फौजदारी बाबत सर्व कामकाज करण्यात आले.

मंगळवार असल्या कारणाने आटपाडी मध्ये पूर्ण दिवसभर महावितरण अंतर्गत कामकाज निमित्त लाईट बंद होती, दुपारी दोन पासून सुनवण्या घेण्यास सुरुवात केली, तरी आटपाडी तहसीलदार यांनी आज सर्व पक्षकारांच्या सुनवण्या आजच पूर्ण करायचा असा निश्चय करून त्यांनी लाईट नसून सुद्धा मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये कामकाज करण्यात आले, याबाबत उपस्थित सर्व संबंधित पक्षकार यांच्या चेहऱ्यावर तहसीलदार साहेब यांच्या कामाबद्दल समाधान दिसत होते.

निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त असताना सुद्धा नागरिकांच्या अडचनी सोडवण्यामध्ये कर्तव्यदक्ष तहसीलदार सागर ढवळे साहेब व त्यांचे महिला कर्मचारी -श्रीमती संजीवनी दहिभाते मॅडम, हेमा खाडे मॅडम,वनिता वाघमोडे मॅडम.यांनी जवळपास रात्री 8 पर्यंत महिला कर्मचारी असून सुद्धा उशिरा पर्यंत काम काज केले. त्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

तसेच पोलीस निरीक्षक श्री.प्रकाश गायकवाड व सोपोनी. जयवंत जाधव जाधव साहेब
यांनी यां सर्व सुनावण्या होईपर्यंत कार्य तप्तरता दाखवली,अशी चर्चा आटपाडी तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये मध्ये सर्वत्र सुरू आहे.

इतरांना शेअर करा