महा आवाज News

आटपाडी तालुक्यातील एका गावातील सरपंचानी संपूर्ण गावचे मतदान देण्याचा विशाल पाटील यांना दिला शब्द,या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

प्रतिनिधी सुधीर पाटील…

तालुक्यामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा नुकताच गाव भेटीचा दौरा संपन्न झाला.या दौऱ्यामध्ये आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गाव बैठका घेण्यात आल्या.व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आढावा चाचणी घेण्यात आली आहे.

पाटील यांचा दौरा सायंकाळी सात ते आठच्या दरम्याने भेट देण्यासाठी एका गावामध्ये आला होता.या गावांमध्ये सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु त्यामध्येच सर्वपक्षीय पाठिंब्याने निवडून आलेले सरपंच उपस्थित होते.

त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून.संपूर्ण गावच्या ग्रामस्था समोर आमचे संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे, आणि गावचे संपूर्ण मतदान तुम्हाला देऊ असा शब्द दिल्याने राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असुन परंतु संपूर्ण गावचे मतदान देऊ हा शब्द अनेकांना खटकला असल्याने अनेक कार्यकर्ते, नेते, ग्रामस्थ त्या सरपंचावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे.

सरपंचावर एका पक्षाचे शिक्कामोर्तब झाले आहे. मग आपण इतर पक्षाच्या नेत्यांना संपूर्ण गावची वकालती घेऊन शब्द कसा काय देता हा गंभीर प्रश्न असून याची त्या गावात व राजकीय वर्तुळामध्ये याची खुमासदार चर्चा सुरू आहे .

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन सरपंचाला निवडून दिले आहे .परंतु काँग्रेसचे नेते लोकसभेसाठी आढाव चाचणी घेण्यासाठी गाव दौरा करीत असताना यामध्ये समस्त ग्रामस्थांच्या समोर आम्ही संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे.

असे गावची जबाबदार व्यक्ती सरपंच यांनी शब्द देणे हे कितपत योग्य आहे व सरपंच म्हणून निवडून एका पक्षा कडून आणि गपचूप भेटतात एका पक्षाला याबाबत तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

इतरांना शेअर करा