नगरपंचायत पाणी पुरवठासाठी प्रथम मोठा निधी शासना कडुन प्राप्त. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या सह सर्व मंत्री मंडळाचे आभार :मा.सुहास बाबर
प्रतिनिधी : सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी :दि.१७ रोजी स्व:आमदार अनिल(भाऊ )बाबर यांच्या प्रयत्नातून यश मिळाले.नगरोत्थान महाभियानांतर्गत आटपाडी नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी ८३.८२ कोटीचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. मा. सुहास बाबर यांनी आटपाडी पत्रकार परिषदे मध्ये सांगितले.त्यावेळी सुहास बाबर म्हणाले की आटपाडी नगर पंचायत साठी जो निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्रजी फडणवीस यांनी यां योजनेस दि.१५ रोजी जीआर काढून मंजुरी दिली आहे,
बाबर पुढे म्हणाले की नगरपंचायत अंतर्गत कामासाठी ८३.८२ कोटी रुपये रकमेच्या निधीमध्ये २ लाख ५८ हजार लिटर ची एक मोठी प्रमुख टाकी असुन यामध्ये बाकी टाक्या गळवे वस्ती,कोर्ट येरिया मध्ये दोन,आंबेबन मळा,कोळेकर मळा,आय.टी.आय कॉलेज, लघुपाटबंधारे आटपाडी अन्य असुन यां योजनेच्या माध्यमातून जवळ जवळ २८४ किलोमिटर पाईप लाइन असुन यां पाईप लाइन मार्फत या सर्व वड्या वस्त्या वरील घराला नळ कनेक्शन मिळेल,
यां योजनेतुन पूर्ण होत आहे आणि यामध्ये योजना करत असताना रस्त्याचे नुकसान होईल ते ही यां योजनेतून दुरुस्त करण्याचे तरतूद केलेली आहे.यां मध्ये महत्वाचे १२०
के.डब्ल्यू.पी चा सोलर पावर प्लॅन्ट यां योजनेत मंजूर झाला आहे. त्यासाठी जवळपास ५१ लाख रुपये या योजनेत मंजूर आहेत.ही योजना म्हणजे आटपाडी मधील सर्वात मोठे काम झाले कारण भविष्यातील नगरपंचायतचा विस्तार लक्षात घेऊन राज्य शासन,नगर विकास खाते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे.
खरंतर आज अनील (भाऊ )हवे होते त्यांनी काही स्वप्ने या मतदारसंघासाठी बघितली होती, त्यामध्ये त्यांनी पाहिलेले कामे आज पूर्णत्वाच्या दिशेने जात आहेत,भाऊ ची सर्व कामे कशी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, यामध्ये माझ्याबरोबर मा.अमरसिंह (बापूसाहेब)देशमुख व तानाजीराव पाटील आहेत. यां दोघांचे सहकार्य लाभले आहे,
यावेळी उपस्थित सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.तानाजीराव पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.अमरसिंह (बापूसाहेब)देशमुख, मा.अमोल बाबर, दत्तात्रय पाटील पंच, मनोज नांगरे-पाटील, साहेबराव पाटील,सुबराव पाटील, ॲड.धनंजय पाटील, सभापती संतोष पुजारी,दिनकर पाटील, पोपट पाटील पंच, संभाजी देशमुख,गजानन देशमुख,अमोल लांडगे व पत्रकार बंधू,सामाजिक,राजकीय कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.