प्रतिनिधी: सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी :लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा आटपाडी शाखे मार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये पतसंस्थेकडून प्रत्येक स्त्री मधल्या मातृत्वाला तिच्या कर्तृत्वाला स्त्रीत्वाला आमचा मानाचा सलाम !
आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ खास महिलांसाठी,महिला सन्मान आवर्तक ठेव योजना किंवा अन्य योजना
या सर्व गोष्टींची माहिती देऊन, आलेल्या सर्व महिलांचा लोकमंगल पतसंस्थेमार्फत शाल,श्रीफळ देऊन येथोचित्त सन्मान करण्यात आला
यावेळी सौ.पूनम विजयकुमार सातारकर ,सौ. योजना मंगेश क्षीरसागर, सौ.शकुंतला भैरवनाथ लांडगे, सौ.धनश्री अनिल पांढरे,सौ.अनिता कुंभार,सौ.स्वाती क्षीरसागर,सौ.आरती माणिक कुंभार
सर्व महिला सह पतसंस्थेमधील पदाधिकारी उपस्थित होते.