पन्नास फूट हुन अधिक पाणी विहीरीत : रेस्क्यू टीमला पाचारण करुन बॉडी काढण्यात आली
प्रतिनिधी:-सुधीर पाटील..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
आटपाडी -भिवघाट रोड कैद्यांची खुली वासहत असणाऱ्या स्वतंत्रपूर जवळ असलेल्या विहिरी मध्ये मित्रांच्या समवेत पोहण्यासाठी गेलेल्या निशिकांत राजेंद्र जाधव वय २० रा.कोष्टी गल्ली आटपाडी याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान या घटनेने आटपाडी शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निशीकांत हा आपल्या इतर मित्रांच्या समवेत स्वतंत्रपूर कडे जाणाऱ्या रोडलगत असरणाऱ्या राहुल राजमाने यांच्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान याच कालावधी मध्ये अन्य युवकही पोहण्यासाठी आले होते.
तर काही युवक पोहणे संपवून विहिरीतून बाहेर पडत होते. याचवेळी निशिकांत याने पुन्हा एक उडी विहिरीत घेतली तो पुन्हा वर आलाच नाही. मित्रांनी बराचवेळ तो वर येण्याची वाट पाहली पण तो वरती आला नाही नंतर मित्रानी विहिरी मध्ये उड्या मारून त्यांची शोधा शोध केली मात्र तो विहिरीमध्ये अतिशय खोलवर गेला होता.नंतर सर्वत्र माहिती लागल्यानंतर सर्व स्तरातून लोकांनी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.
मात्र विहिरी मध्ये ५० फुटा पेक्षा जास्त पाणी असल्याने शोध मोहीम राबविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक युवकांनी पाण्या मध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला व पाणी काढण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आले होते. विहरी जवळूनच आटपाडी तलावाच्या पाण्याचा कॅनॉल जात असल्याने विहिरीमधील मधील पाणी उपसने अशक्य होते.
शोध घेणे असफल झाल्याने अखेर सांगली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. आयुष हेल्पलाईन टीम आल्या नंतर त्यांनी दोरीला गळ बांधून शोधून ५० फूट पेक्ष्या जास्त पाण्यातून मृतदेह वर काढला .कुपवाड टीम प्रमुख अविनाश पवार, रुद्रप्रताप कारंडे, यश मोहिते, कयूम सनदी, प्रमोद ऐवळे यांनी यांच्या माध्यमातून मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले.