महा आवाज News

जनताच दार फोडून संसदेत पाठवेल

विशाल दादा पाटील: वसगडे, भिलवडी, अंकलखोप येथे प्रचार सभा
सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी :सांगली  जिल्ह्यातील जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली आहे. यामुळे आता किती जरी बडा नेता आला तरी जनताच खासदार ठरवणार आहे. याच कारणाने मी बंद दार फोडून खासदार होणार आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
येथे रणरणत्या उन्हात तरुणांच्या मोटारसायकलवरून मुख्य बाजारपेठेत विशाल पाटील यांचे आगमन झाले.
प्रचार रॅली झाल्यानंतर सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले,
मुंबईतील मराठी लोकांवरती अन्याय होऊ नये म्हणून स्व. वसंतदादांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना वाढीसाठी मदत केली. त्यांच्याच पक्षाने आघाडीला विश्वासात न घेता उमेदवाराची घोषणा केली. अनेकांच्या पुढे पेच निर्माण केला. परंतु जनता सुज्ञ आहे. ती नक्कीच मला लिफाफ्यातून प्रेमाचा आहेर देणार आहे. जाईल तिथे सर्व जनतेचा, मतदार बंधू-भगिनी, तरुणाई यांचा प्रचंड उत्साह बघायला मिळतो हीच माझ्या विजयाची नांदी आहे.
  मी निवडणूक लढू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले. आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी तीन महिने उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना प्रत्येक ठिकाणी खो घालण्यात आला.
ते म्हणाले, अनेक जण भीतीने पक्ष सोडून जात आहेत. दादा घराण्यावरती प्रेम करणारी जनता अजूनही आहे हे मला प्रत्येक ठिकाणी जाणवते यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
 माझी मते व वंचितचे मते यामुळे मी दोन लाखाने विजय होईल असा विश्वास त्यांनी दिला. पलूस-कडेगाव मधून चाळीस हजार मताधिक्य मिळेल असा विश्वास वाटतो.
पलूस तालुक्यातील वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडीतील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सांगली कारखान्याचे संचालक व भिलवडीचे प्रमुख नेते राजूदादा पाटील, माजी जि.प.सदस्य संग्रामदादा पाटील, येळावीचे विजय (आण्णा) पाटील, वसगडे येथील पंचायत समितीचे माजी सदस्य अमोल पाटील, विजय चोपडे, प्रल्हाद गडदे, मोहन पाटील, दादा सूर्यवंशी, गणपतराव सावंत, संताजी जाधव उपस्थित होते.  स्वागत बी. डी. पाटील तर  सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.

इतरांना शेअर करा