प्रतिनिधी : सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी दि . १० रोजी आटपाडी येथील कष्टाळू शेतकरी, शांत, संयमी, मितभाषी व्यक्तीमत्व पांडुरंग बापूराव पाटील यांचे आज वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .
कष्टातच परमेश्वर शोधणाऱ्या कै . पांडुरंग पाटील यांनी, आयुष्यभर देवगुणी माणसासारखेच समाधानी आयुष्य व्यतित केले आहे . त्यांच्यामागे सुविद्य पत्नी, डॉक्टर मुलगा, उच्चशिक्षित मुलगी, भाऊ, चुलतभाऊ भावजयी, पुतणे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .
श्री . भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य रावसाहेब काका पाटील यांचे दिवंगत पांडुरंग पाटील हे सख्खे चुलतभाऊ होत .
मंगळवार दि . १२ रोजी सकाळी ८ .३० वाजता आटपाडी स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाचा धार्मिक विधी होणार आहे .