महा आवाज News

आत्माअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी प्रात्यक्षिक आधारीत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
 कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी व्यस्थापन प्रात्यक्षिक आधारित शेतकरी प्रशिक्षण मौजे-पणदरे येथे योगेश कोकरे यांचे प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आले.
यावेळी ऊस संशोधन केंद्राचे पाडेगाव माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ हनुमंत भोईटे,  होळ आघारकर संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भानुदास ईधोळ, कनिष्ठ शास्त्रज्ञ दत्तात्रय साळुंखे, वडगाव निंबाळकरचे मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे,  आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, पणदरेच्या कृषी सहायिका  मनीषा यादव आदी उपस्थित होते.
श्री. भोईटे यांनी ऊस सुपरकेन नर्सरी व ऊस बेणे प्रक्रिया, नर्सरी तयार करणे. रोप लागवडीची योग्य पद्धतीऊस पिकातील हुमणी किड नियंत्रण, रोग नियंत्रणविषयी विषयी मार्गदर्शन केले.
श्री. ईधोळ आणि श्री. साळुंखे यांनी ऊस पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीन लागवड लागवड करणे, सोयाबीन पीक उत्पादन तसेच सोयाबीनच्या विविध वानांविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी वडगाव निंबाळकर मंडळातील शेतकरी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा