महा आवाज News

इंदापूर मध्ये विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार- अंकिता पाटील ठाकरे

प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
 इंदापुर तालुक्यातील वेगवेगळ्या पदावर तसेच परीक्षेत विशेष प्रावीन्य मिळवलेल्या तरुण तरुणींचा पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये ऋतुजा नामदेव होरणे, पळसदेव यांची सहायक कृषी अधिकारी पदी निवड झाली. तसेच हर्षदा अरुण राऊत, निमगाव केतकी हिला नीट परीक्षेत ६६० गुण मिळवून यश मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी ना. रा. हायस्कूल इंदापूरमध्ये शिक्षण घेतले आहे.
तसेच शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस.बी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा विद्यार्थी ओंकार जाधव याला आर्मो इंजिनिअरिंग नेदरलँडमध्ये ३३ लाखांचे पॅकेज मिळाले. यामुळे अंकिता पाटील यांनी त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले.
यावेळी त्या म्हणाल्या, आपल्या तालुक्यातील तरुण तरुणींनी वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेऊन नाव कमवलं की, मन अभिमानाने भरून येतं.
तालुक्यातील आपल्या शिक्षणाच्या गतीमुळे ते शक्य होतं आहे. कै. शंकरराव पाटील (भाऊबाबा) आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी उभ्या केलेल्या या संस्थांचे जाळे अनेक तरुणांच्या आयुष्यात एक प्रकाश टाकत आहेत. हे सगळे विद्यार्थी आपल्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेऊन यशस्वी झाले. याचा मनस्वी आनंद आहेच पण एक दूरदृष्टी ठेवून उभ्या केलेल्या या शिक्षणसंस्था आज अनेकांच्या कर्तृत्वाला वळण देत आहेत याचा वेगळाच आनंद आहे.
या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाचेच नव्हे तर तालुक्याचे नाव मोठं केलं आहे. दरवर्षी अशा प्रकारचा ठसा उमटवण्यात आपला तालुका आणि शिक्षणसंस्था कुठेही मागे नाहीत, ही बाब खूपच आनंददायी आणि कौतुकास्पद आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.

इतरांना शेअर करा