संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
महाराष्ट्र मध्ये सध्या राजकारणात प्रचंड घडामोडी चालू आहेत त्यामध्ये बारामती मतदारसंघाचे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षात ही मोठी फूट पडलेली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं आहे. चिन्ह दिल असलं तरी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे की अजित पवारांच्या गटाच्या उमेदवाराला त्यांच्याच पक्षाचे घड्याळ चिन्ह मिळणार नाही अशी माहिती समोर येत आहे पण ही बातमी महाराष्ट्र आणि नागालँडच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत नाही तर लक्षद्वीप मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत आहे.
अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार यांच्या गटाच्या नागालँड मध्ये व महाराष्ट्र मध्ये वापरण्यास परवानगी मिळालेली आहे.
पण लक्षदीप मध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टीपी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लक्ष्यद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह का मिळणार नाही?
अजित पवार यांच्या पक्षाला 2024 सार्वत्रिक निवडणुकात प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे यासाठी त्यांनी अर्ज केला होता.चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. अजित पवार गटाने 24 मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्चला निघाली. एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही. लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही. इतर सर्व ठिकाणी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळेल.
अजित पवार यांच्या पक्षाला दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्पेपर्यंतच्या मतदार प्रक्रियेत घड्याळ चिन्ह देशभरात वापरता येणार आहे पण पहिल्या टप्प्यात वापरता येणार नाही.