महा आवाज News

NCP अजित दादा पवार यांनी उमेदवारांची नावे केली जाहीर

कोण आहेत ते उमेदवार?

अजित पवारांनी कोणत्या नेत्यांना दिलं लोकसभेचं तिकीट.

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंत 23 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सर्व जनतेचे लक्ष हे उमेदवार कोण आहे याकडे लागलेले होतं त्याच मध्ये बारामती मध्ये नक्की कोण लढणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणा करण्यात आल्या नव्हत्या.

अजित पवार यांनी जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे, याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ‘आमच्या महायुतीमध्ये कोणताही गोंधळ नाही. आम्ही एकत्र बसलो आणि सीट शेअरिंगचा निर्णय घेतला. भाजप आणि शिवसेनेने आम्हाला सहकार्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा त्याच मतदारसंघातून अजित पवारांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

शिरूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे नाव उमेदवारीसाठी घोषित केले आहे.

सगळ्या जनतेचे लक्ष लागलं आहे ते बारामती मध्ये कोण लढणार उमेदवारी म्हणून. बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं तिकीट पक्कं असल्याचं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे या तिसऱ्या जागेचा प्रश्नही निकालात निघाला आहे.

अशाप्रकारे उमेदवारी जाहीर केलेली आहे.

इतरांना शेअर करा