महा आवाज News

अजित दादांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या कार्यकर्त्यांचे प्रत्युत्तर…

युगेंद्र दादा पवार यांना घेराव घालणारा अजून बारामती जन्माला यायचा आहे.

प्रतिनिधी – संदिप आढाव..

सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ही बारामती लोकसभा मतदारसंघाकडे असल्याचे पाहायला मिळत आहे कारण तेथे पवारांच्या विरुद्ध पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो तो पक्ष आपल्या पक्षाचा प्रचार गाव दौरे करताना पाहायला मिळत आहेतपण या दौऱ्यामध्ये युवा नेते योगेंद्र पवार यांच्या विषयी खोटी अफवा पसरलेली जात असल्याचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले

बारामती तालुक्यातील करंजे गावा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे युवानेते युगेंद्र पवार यांच्या गाव भेट दौऱ्या दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी च्या काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातल्याची बातमी ही वाऱ्यासारखी पसरलेली.

खऱ्या अर्थाने पवारांचे काम हे विरोधी पक्षाला पाहू वाटत नाही, म्हणून त्यांना गालबोट लागावं,म्हणून विरोधी पक्ष काम करत असल्याचा आरोप शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

या बातमीला तसेच अजितदादांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शरदचंद्र पवार च्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलेले पाहायला मिळाले.

इतरांना शेअर करा