मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी दिल्याबद्दल सरकारचे मनःपूर्वक आभार :आमदार गोपीचंद पडळकर
प्रतिनिधी: सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी :अहमदनगर चे नाव बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर” नामांतरास मंजुरी दिल्या मुळे आटपाडी तालुक्यात विविध ठिकाणी आनंदउत्सव साजरा करताना दिसून येत आहे
अहमदनगर चे नाव बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” केल्याबद्दल आज रोजी आंबेवाडी ता.आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि सर्वांना पेढे वाटप करून सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी सर्व राजकीय सामाजिक मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.