महा आवाज News

अहिल्यानगर येथे विशालदादांच्या प्रचारार्थ बैठका

सुधीर पाटील 
आटपाडी
 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर परिसरात बैठका घेण्यात आला. यावेळी ऐश्वर्याताई प्रतिक पाटील उपस्थित होत्या. विशालदादा पाटील यांना खासदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अहिल्यानगर येथे झालेल्या प्रचार बैठकीला माजी नगरसेवक प्रशांत पाटील, बाळू गुरव, सचिन पवार, मोहन नलवडे, परवेज मुलाणी, इकबाल मुल्ला, अजिंक्य मोहिते, अमीन शेख, मनोज पवार, राहूल माने उपस्थित होते.
ऐश्वर्याताई पाटील म्हणाल्या की, वसंतदादांच्या विचारांचा वारसा घेऊन विशालदादा पाटील जिल्ह्यात काम करीत आहेत. त्यांच्या रुपाने विकासासाठी आग्रही असलेले नेतृत्व दिल्लीला जाण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा विकास थांबला आहे. संजयकाकांनी विकासकामे केलेली नाहीत. भाजपच्या सत्ता काळात महिलांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी महिलांनी विशालदादा पाटील यांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.

इतरांना शेअर करा