लग्नकार्यात वृक्षदान उपक्रम ठरला उत्कृष्ट:तालुक्यात सर्वत्र चर्चा
प्रतिनिधी:- सुधीर पाटील..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
आटपाडी :आटपाडी येथील कल्पतरू नर्सरीचे संस्थापक,मा.फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष,सर्वांशी सलोख्याचे व मैत्रीचे संबंध जपणारे सामाजिक कार्यकर्ते बजरंग फडतरे साहेब यांची कन्या चि.सौ.का.शितल हिचा विवाह लासुर्णे ता.इंदापूर येथील चि.अमोल भोसले यांच्याशी दिघंची रोड वरील साळुंखे मल्टीपर्पज हॉल येथे पार पाडला.
आजपर्यंत अनेक विवाहसमारंभात फेटे,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सर्व पाहुण्यांच्या स्वागत केलेले पाहावयास मिळते .
परंतु बजरंग फडतरे व संगीता फडतरे या दांपत्यानी आपल्या कन्येचे विवाहसोहळ्यात उपस्थित सर्वसामान्यांपासून प्रमुख पाहुण्यांना आंब्याची केशर, हापूस, पायरी प्रजातीची रोपे तसेच गुलाब, मोगरा,फुलझाडे प्रदान करून अनोख्या पद्धतीने सर्वांचे स्वागत केले.
त्यामुळे या अनोख्या विवाहसोहळ्याची तालुकाभर चर्चा रंगली.फडतरे यांनी झाडाच्या माध्यमातून माणुसकीची व आपुलकीची सावली देण्याचा प्रयत्न केला असल्याचे गौरवोदगार आमदार.गोपीचंद पडळकर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवसेना नेते मा.सुहास बाबर यांनी काढले .
या उपक्रमाचे कौतुक माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भारत पाटील, यु.टी. जाधव , सुमनताई नागणे , अरुण बालटे , दादासाहेब मरगळे, भागवत माळी, राजेश सातारकर , पंढरीनाथ नागणे, प्रभाकर पुजारी, दत्तात्रय पाटील( पंच),मनोज नांगरे-पाटील,शहाजी जाधव,विजय देवकर यांच्यासह अनेकांनी केले .
यांच्या सह आलेल्या सर्व पाहुण्यांनी या उपक्रमा बद्दल प्रसूंषा केली.