महा आवाज News

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात एक दिवसीय वेब डेव्हलपमेंट कार्यशाळा उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

विद्या प्रतिष्ठानच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील
बी.बी.ए.(सी ए)विभागामार्फत नुकतीच एक दिवसीय वेब डेवलपमेंट टेक्नोलॉजिज या विषयवार कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेत एसवाय बी बी ए सी ए व टीवाय बी बी ए सी ए या वर्गातील १९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विभागप्रमुख महेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वेब डेवलपमेंट तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात, वेब विकास हा डिजिटल युगाचा आधारस्तंभ आहे.ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपासून परस्परसंवादी सोशल नेटवर्क्सपर्यंत, आपण दररोज वापरत असलेल्या वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्स ही कुशल वेब डेव्हलपरची निर्मिती आहे. 2025 मध्ये या टेक्नोलॉजिज मुळे कृत्रिम तंत्रज्ञान क्षेत्रातील संभाव्य उपलब्ध संधी प्राप्त होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुन्यांचा परिचय कार्यशाळा समन्वयक विशाल शिंदे यांनी करून दिला.

कार्याक्रमाचे अध्यक्ष डॉ.भरत शिंदे वेब टेक्नोलॉजिजचा वापर केल्यास उत्तम संधी प्राप्त व्हाव्या हा या कार्यशाळेमागचा मुख्य उद्देश आहे अशी आशा व्यक्त केली.

महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.शामराव घाडगे सर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उदय होत असताना, या क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नवीनतम वेब डेव्हलपमेंट कौशल्ये जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे नमूद केले.

कार्यशाळेचे तज्ञ वक्ते मा.मेघराज भोसले यांनी मिटकॉन मधील विविध कोर्सेस,मा.गणेश जाधवर यांनी फ्रंट एंड डेवलपमेंट टेक्नोलॉजिचा वापर करून प्रत्यक्ष वेब साईट प्रात्यक्षिकासहित तयार करुन दाखवली.मा.अविनाश कोकरे यांनी back एंड डेवलपमेंट टेक्नोलॉजिचा वापर करून वेब साईट चा डाटा कसा जोडता येतो हे प्रात्यक्षिकासहित करुण दाखवले.

तसेच मा.मुकुंद कडू सर यांनी सायबर सुरक्षा या विषयवार उत्कृष्ट असे प्रात्यक्षिकासाहित आपले अनुभव प्रस्तुत केले व या क्षेत्रातील संधी अनेक पदाबाबत आणि इतर कोर्सेस बद्दल इत्यभूत माहिती दिली.
कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे,उप-प्राचार्य डॉ.शामराव घाडगे ,डॉ.लालासाहेब काशीद यांचे सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन वैशाली पेंढारकर यांनी केले. आभार प्रदर्शन पूनम गुंजवटे यांनी मांडले. तसेच शुभांगी निकम,अक्षय भोसले, अनिल काळोखे व सतीश चौधर यांनी मदत केली.

इतरांना शेअर करा