प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
आगप्रकरणी कंपनी व्यवस्थापनच जबाबदार आहे असे वक्तव्य रवीश रासकर यांनी केले आहे.पारनेर तालुक्यातील सुपा जुन्या एमआयडीसीमध्ये व्हीजी कार्बन ही कंपनी आहे. या कंपनीला गुरूवारी सकाळी भीषण आग लागली. या कंपनीला सेफ्टी कोणतीही यंत्रणेसह कोणत्याही प्रकारची आग नियंत्रण यंत्रणा उपलब्ध नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
याला सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन जबाबदार असल्याचे मनसेचे नेते रवीश रासकर यांनी सांगितले.
आग लागल्यानंतर बाहेरून गाडी बोलाविण्यात आली. गाडी येईपर्यंत खूप वेळ झाला आणि ही आग एवढी भयानक होती की, शेजारी केमिकलची कंपनी आहे.
जर त्या कंपनीला या आगेची झळ लागली असती तर भयानक स्फोट झाला असता आणि होणाऱ्या जीवितहानीस जबाबदार कोण? त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नये, यासाठी मनसे नेते रासकर यांनी तहसीलदार, उपअभियंता अहिल्यानगर एमआयडीसी कार्यालय, नवनागापूर आणि जिल्हाधिकारी, यांना निवेदनाद्वारे कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.
अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून रबरच्या आणि टायर कार्बनच्या जेवढ्या कंपन्या असतील त्यांचे ऑडिट करून ज्या बेकायदेशीर टायर कंपन्या आहेत, त्या कंपन्या त्वरित सील करण्यात याव्यात, ज्या कंपनी मध्ये कामगारांसाठी सुरक्षा नसेल अशा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. अन्यथा आंदोलन किंवा उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.