महा आवाज News

मिंडा कंपनी ते बाबुर्डी रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..

संबंधित प्रशासनाला उपोषणाचा इशारा -रविश रासकर..

सुपा पारनेर नवीन औद्योगिक वसाहतीतील मिंडा कंपनी ते बाबुडी पर्यंत दीं. ०५/०१/२०२४ रस्त्याचे काम चालू झाले होते. सदर रस्त्याचे कामाची मुदत्त १२ महिने आहे.
इस्टिमेट नुसार रस्त्या रुंदीकरण, माती भराव, खडीकरण, मुरूम , बाजू पट्टी , कच्चे घटस, संकीर्ण बाबी मजबुतीकरण, आणि चांगले डांबरीकरण असे करण्यास सांगितले आहे.

रस्त्याची कामे होऊन थोडा अवधी गेला नाही तोच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत आणि रस्ता उखाडलेला दिसत आहे. तरी इस्टिमेट नुसार सदर ठेकेदाराने काम केलेली नाही. रस्त्याच्या साईडने साईट पट्ट्या पण नाहीत आणि पाणी जाण्यासाठी चारी पण नाही आणि रस्त्यावर साईड पट्ट्या पण मारलेल्या नाहीत. आता रस्त्याच्या ठिकठिकाणी मोठमोठाली खड्डे पडलेले आहेत आणि रस्ता उखडलेला आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून त्या ठेकेदाराची लायसन कायमस्वरूपी बंद करावे अशी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. हे काम दि. ०५/०१/२०२५ पर्यंत जर इस्टिमेट नुसार पूर्ण झाले नाही तर मनसेचे नेते रविश रासकर हे बाबुर्डी रोड म्हसने फाटा फेज २ एमआयडीसी चौक येथे दि. १३/०१/२०२५ रोजी उपोषणाला बसणार आहे असे त्यांनी सांगितले. मनसे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर हे रस्त्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

मनसे नेते रविश रासकर यांनी अशा आशयाचे उपोषण निवेदन होळकर मा. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर, मा. कार्यकारी अभियंता कार्यालय सार्वजनिक विभाग अहमदनगर, मा. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, मा. पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर मा. जिल्हा चिकित्सा अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांना दिले आहे.

इतरांना शेअर करा