प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा वाढदिवस (दि.१२) संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. गावातील ग्रामस्थांनी पवार साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे. दरवर्षी प्रमाणे गावातील काही मंडळींनी प्राथमिक शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसोबत पवार यांचा वाढदिवस साजरा केला.आणि त्यांच्याबद्दल असलेले प्रेम वाढदिवस साजरा करून व्यक्त करून दीर्घायुष्याची प्रार्थना केली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. अशा पद्धतीने म्हसोबाची वाडी गावातील ग्रामस्थांनी युवा पिढीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे.
दिनांक 12/12/2024 रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी विकास सोसायटी म्हसोबाची वाडी चेअरमन अनिकेत झेंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लाला साळुंखे ,मा. उपसरपंच निलेश पवार तसेच मा. उपसरपंच दादासो पवार, सामाजिक कार्यकर्ते विकास चांदगुडे, अथर्व किराणाचे मालक सचिन पवार, सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन चांदगुडे, चीडबाय राहुल चांदगुडे, पृथ्वीराज चांदगुडे, प्रतीक मराळ, दीपक चांदगुडे, सुहास पवार आदी मान्यवर व प्राथमिक शैक्षणिक संस्था मुख्याध्यापिका पाटक मॅडम ,उपमुख्याध्यापक शिंदे सर आणि संपूर्ण शिक्षक स्टाफ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी म्हसोबाची वाडी गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.