महा आवाज News

पुणेकर आता हेल्मेट सक्ती नाही पण पुणे पोलीस आयुक्त कडून माहिती..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: – 9373004029..

पुणे दुचाकीस्वारासह सहप्रवाशानेही हेल्मेटचा वापर करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून सुरुवातीला जनजागृती करण्यात येणार आहे.

दुचाकीचालविताना संबंधितांनी हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून, तूर्तास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार नाही, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

‘परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वषांत, जानेवारीमध्ये कारवाईबाबतचा निर्णय घेऊ,’ असेही त्यांनी सांगितले.

रस्ते दुचाकीस्वार अपघातामध्ये व सहप्रवासी (पीलियन रायडर) यांच्या मृत्यू आणि जखमींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या दोघांना हेल्मेट आवश्यक असून, ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत.

सहप्रवाशांवर ‘स्वतंत्र हेड’ खाली कारवाईसाठी ‘ई चलन’ मशिनमध्ये बदल करण्याची सूचना आदेशात केली होती. त्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले, पुणेकर सुरुवातीपासूनच हेल्मेटसक्तीच्या विरोधात असून, त्यासाठी नागरी आंदोलनही उभे राहिले होते.

आता दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेटसक्ती करण्याच्या निर्णयाबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, जनभावना लक्षात घेऊन तूर्तास दंडात्मक कारवाई न करण्याची भूमिका शहर पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, शहरात हेल्मेटसक्ती लागू करू नये, या मागणीसाठी आमदार हेमंत रासने यांनी पोलिस आयुक्तांची गुरुवारी भेट घेतली. शहरातील नागरिकांना या सक्तीला सामोरे जावे लागणार नाही, अशी ग्वाही हेमंत रासने यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांचे स्वसुरक्षेसाठी पालन करणे गरजेचे आहे. महामार्गावर वाहन चालवताना, सर्वांनी नियम पाळावेत, असे आवाहनही रासने यांनी केले.

इतरांना शेअर करा