प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे .
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: – 9373004029..
खासदार निलेश लंके यांनी दौंडमध्ये येत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी जोरदार बॅटिंग करत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी समोरासमोर या अस आव्हान दिलं होतं

हे आव्हान मी स्विकारतो असे म्हणत आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना चर्चा करण्यासाठी पत्रकरांनी निमंत्रित करावं असे सांगितले होते त्याच पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांना यवत मध्ये पत्रकरांनी विचारले असते थोरात यांनी बगल दिली आणि कुल याचं आव्हान एकप्रकारे नाकारल च आहे .

तर यावर आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की खासदार निलेश लंके यांनी दिलेले आव्हान स्वीकारले होते. परंतु आमचे विरोधक मात्र चर्चेला न येता पळ काढत आहेत त्यामुळे त्यांना दौंड तालुक्यातील विकास मान्यच आहे असे दिसून येते.
