प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार व बावडा गावचे सुपुत्र हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांची जाहीर प्रचार सभा बावडा येथे शनिवारी (दि.16) सायंकाळी 7 वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खा. खा.धैर्यशील मोहिते पाटील हेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन भाऊ पाटील यांचे बावडा हे गाव असल्याने या सभेला उच्चांकी गर्दी होणार असून, बावडा-लाखेवाडी जि. पं. मतदारसंघ हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
सदर सभेमध्ये खा. सुप्रिया सुळे, खा.धैर्यशील मोहिते पाटील काय बोलतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे. बावडा येथे होणाऱ्या या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.