प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ खा.अमोल कोल्हे यांची जाहीर प्रचार सभा निमगाव केतकी येथे कर्मयोगी कारखाना रोडवरती शनिवार (दि.16) रोजी दुपारी 2.30 वा. होणार आहे.
खा.अमोल कोल्हे यांचा सभांचा धडाका राज्यात जोरात सुरू आहे. निमगाव केतकी येथे होणाऱ्या खा.अमोल कोल्हे यांच्या सभेची वेळ यापूर्वी सायंकाळी 4 वा. अशी जाहीर करण्यात आली होती. मात्र सदर वेळेस बदल झाला असून, खा.अमोल कोल्हे सभा दुपारी 2.30 वा. होणार आहे. तरी सदरच्या सभेस दुपारी 2.30 वा. वेळेवर उपस्थित राहावे, अशी आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.