प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निशिकांत भोसले पाटील यांना उमेदवारी दिली.
सांगलीचे माजी भाजप खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.
त्यांनी पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांची पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली – इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आणि तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील निवडणूक लढवणार आहेत.
दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चांगलं बळ मिळणार आहे.