प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
वांद्रे पूर्वचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झीशान सिद्दिकी यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते. पक्षात त्यांचे स्वागत करताना अजित पवार म्हणाले, “झीशान त्यांच्या वडिलांचा जनसेवा आणि समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवेल.”
2019 ची निवडणूक त्यांनी वांद्रे पूर्व येथून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला. त्यांनी पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.