प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
जगातील सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी असलेली ‘भारत फोर्ज’ कंपनी बारामतीमध्ये ५० एकर जागेवर मेगासाईट उभारली जाणार आहे. कल्याणी टेक्नोफोर्जच्या या मेगासाईटच्या प्रकल्पात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे व त्यातून १,२०० रोजगार निर्माण होणार आहेत.
या प्रस्तावित प्रकल्पामध्ये ऍल्युमिनियम फोर्जिंग, सुटे भाग, स्टील फोर्जिंग, असेंब्ली व सब-असेंब्ली, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनांसाठी गिअर मॅन्युफॅक्चरिंग तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे.
या प्रकल्पासाठी ५० एकर जागेच्या मागणीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.