महा आवाज News

बारामती तालुक्यातील विद्यार्थिनींना युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून मोफत सायकलींचे वाटप..

प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..

 

विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून शरयू फाउंडेशनच्या वतीने आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने बारामती तालुक्यातील शालेय विद्यार्थींनींना दीड हजार सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. मुक्ताई लॉन्स, बारामती येथे आज हा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतिशमामा खोमणे, जयश्री सातव, पौर्णिमा तावरे, राजेंद्र बापू जगताप, शहराध्यक्ष संदीप गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा वनिता बनकर, महिला शहराध्यक्षा आरती गव्हाळे, युवती तालुकाध्यक्षा प्रियांका शेंडकर, युवती शहराध्यक्ष प्रियांका खारतोडे, तालुका युवक अध्यक्ष प्रशांत बोरकर, शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, तालुका युवक कार्याध्यक्ष गौरव जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

घरापासून शाळा दूर आहे आणि शाळेत जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही म्हणून ग्रामीण भागातील कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये, या उदात्त भावनेतून हा मोफत सायकल वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.

यापूर्वीही‌ सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ‘टु व्हिल्स ऑफ होप’ उपक्रमांतर्गत आजवर तब्बल २६ हजार सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला गती मिळाली असून कितीतरी गावांतील मुली सायकलींवरून आनंदाने शाळेत जाताना दिसतात. ठिकठिकाणच्या मुली अशा सायकलींवरून शाळेला जाणे हे अत्यंत सुखद चित्र असून यापुढेही असे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी जाहीर केले.

इतरांना शेअर करा