महा आवाज News

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने फराळ व तेल वाटप संपन्न

प्रवीणभैय्या माने मित्रपरिवाराच्या माध्यमातून मंडळांना नवरात्रीची भेट..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

सालाबादप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सोनाई परिवाराचे संचालक तथा बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांनी तुळजापूरहुन आई भवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या मंडळांची मनोभावे सेवा केली.

पुणे सोलापूर महामार्गावर आपला स्वागत कक्ष उभारून माने यांनी तुळजापूराहून भक्तीज्योत घेऊन येणाऱ्या विविध मंडळांच्या सदस्यांना दूध, फराळ, फळे, पाणी व ज्योतीसाठी तेलाचे वाटप केले.

नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर तुळजापूरहून आई भवानीची ज्योत संपूर्ण रस्त्याने धावत आणने ही संपूर्ण इंदापूर तालुक्यातील विविध गावे व मंडळांची फार जुनी प्रथा आहे. या भाविकांची मनोभावे सेवा करून आपण यातूनच दरवर्षी ईश्वरसेवा साधत असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले.

महामार्गावर उभारण्यात आलेल्या या स्वागत कक्षाच्या माध्यमातून माने यांनी ३०० हून अधिक मंडळांचे याठिकाणी स्वागत केले व मंडळातील तब्बल ७००० सदस्यांना फराळ व पाण्याचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले.

इतरांना शेअर करा