प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029
आपल्या अनोखी कामगिरीबद्दल ओळखले जाणारे औषध निर्माण अधिकारी अनुपसिंह गौड यांची ओळख आहे. आपल्या समाजात अनेक गोरगरीब आणि गरजू रुग्ण विविध आजाराने ग्रासलेले आहेत. अनेक रुग्ण यांची परिस्थिती हालाखीची आर्थिक दुर्बल आसल्याचे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा गोर आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट् राज्य- प्रभारी पदी अनूपसिंह गौड यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
सध्या गरीब रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच शासकीय योजनांचा माहिती अभावी लाभ घेता येत नाही. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रमुख जितेन्द्र जी सातव यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन वैद्यकीय मदत कक्ष राज्य- प्रभारी पदी अनूपसिंह गौड यांची नियुक्ती करण्यात आली.
रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजून हे काम मी चांगलेच प्रामाणिकपणे करेल असे वक्तव्य अनूपसिंह गौड यांनी केले आहे.