महा आवाज News

रोहिदास पाटील यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान – हर्षवर्धन पाटील

खानदेशचा कणखर सुपुत्र हरपला -हर्षवर्धन पाटील

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

राज्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठे योगदान लाभले आहे. दाजींच्या निधनाने खानदेशचा कणखर नेतृत्व लाभलेला सुपुत्र हरपला आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे जेष्ठ नेते रोहिदास पाटील (वय 84 वर्षे) यांचे शुक्रवारी सकाळी 11 वा. निधन झाले. रोहिदास पाटील उर्फ दाजी हे सन 1978 पासून विधानसभेत होते. तर 1995 ते 2009 पर्यंत सलग 15 वर्षे विधिमंडळामध्ये ते आमचे जेष्ठ सहकारी होते, तसेच मंत्रिमंडळामध्ये आंम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले. रोहिदास पाटील उर्फ दाजी हे माझे मार्गदर्शक होते. राज्याचे संसदीय कार्यमंत्री असताना त्यांनी आंम्हास विधिमंडळ कामकाजातील बारकावे शिकवले, त्याचा पुढे मी संसदीय कार्यमंत्री झालेवर अतिशय चांगला उपयोग झाला, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मंत्रिमंडळामध्ये रोहिदास पाटील यांनी कृषी खात्याचे मंत्री म्हणून वेगळी छाप निर्माण केली. त्यांनी धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केली.

दाजींचे व्यक्तिमत्व कणखर व शिस्तप्रिय होते, शिवाय ते उत्तम प्रशासक होते, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. रोहिदास पाटील यांचे सुपुत्र व माझे मित्र आ.कुणाल पाटील यांना व संपूर्ण पाटील कुटुंबीयांना सदरचे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर निश्चितपणे देईल अशी भावनाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

इतरांना शेअर करा