प्रतिनिधी:- कपिल कांबळे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे,
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब अंतर्गत विज्ञान शाखा आणि बेस्ट प्रॅक्टिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये “”सायन्स फेस्ट २०२४” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायन्स फेस्ट २०२४ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.काजल राजेभोसले मॅडम यांनी केले व एकूणच दिवसभरात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. वीरसिंह रणसिंग (भैय्या) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनातील नवनव्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.विजय केसकर, उपप्रचार्य ज्ञानेश्वर गुळीग तसेच परीक्षक डॉ.राजेंद्र साळुंखे,डॉ.विजय मोहिते व डॉ.प्रशांत शिंदे विज्ञान शाखाप्रमुख डॉ. सुहास भैरट, बेस्ट प्रॅक्टिस समितीप्रमुख प्रा. सचिन आरडे तसेच सर्व संघ व्यवस्थापक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी ठीक १०:३० वाजता सायन्स फेस्ट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये एकूण दहा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. एकूण ८५ विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले.
यामध्ये मॉडेल्स विभाग प्रथम क्रमांक: एन ई एस हायस्कूल निमसाखर, द्वितीय क्रमांक: एल.जी. बनसोडे विद्यालय पळसदेव, तृतीय क्रमांक: विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब तसेच पोस्टर विभाग प्रथम क्रमांक: श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर, द्वितीय क्रमांक: विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, तृतीय क्रमांक: कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली पारितोषिक वितरण समारंभ दुपारी ३:०० वाजता महाविद्यालयाच्या विश्वास सभागृह मध्ये संपन्न झाला. सायन्स फेस्ट २०२४ या स्पर्धेमध्ये एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये ३१ मॉडेल्स व १६ पोस्टरचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
n
विद्यार्थी मनोगतामध्ये ओमकार रणसिंग, सना सलीम शेख या दोन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अशी स्पर्धा पुन्हा पुन्हा आयोजित करावी असे मत व्यक्त केले. प्रा.अपेक्षा मेटकरी यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.