प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामती: विद्या प्रतिष्ठानचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मधील बी.बी.ए.(सी. ए.), बीएससी (सी. एस ) ,एमएससी (सी.एस), बीएससी (सी.ए.) विभाग आणि 3WD सॉफ्ट कंपनी, बारामती यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य.डॉ.शामराव घाडगे व उपप्राचार्य.डॉ.लालासाहेब काशिद, आय क्यू एसी समन्वयक प्रा.नीलिमा पेंढारकर तसेच संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी बी.बी.ए.(सी.ए.), विभागप्रमुख महेश पवार, बी.एस.सी.(सी.ए.) विभागप्रमुख किशोर ढाणे एमएससी (सी.एस), समन्वयक डॉ.जगदीश सांगवीकर, आणि 3WD सॉफ्ट कंपनीचे किशोर काजळे ,सुरेंद्र थोरात ,हनुमंत फरांदे यांनी स्वाक्षरी केली.
सदर करार हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान संशोधन, नाविन्य, उद्योजकता आणि नोकरीच्या संधींच्या बाबतीत जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. नाविन्यपूर्णतेद्वारे विद्यार्थ्यांना समृद्ध करण्याचे महाविद्यालयाचे ध्येय पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना तयार करणे असे एकत्रितपणे उद्दिष्ट या कराराद्वारे पार पाडण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.
हा सामंजस्य करार पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ.शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशिद, आय.क्यू.ए.सी.समन्वयक नीलिमा पेंढारकर यांचे सहकार्य लाभले.तसेच बी.बी.ए. (सी.ए.) विभागप्रमुख महेश पवार, संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी, बी. एसी. सी.(सी.ए.) विभागप्रमुख किशोर ढाणे, गौतम कुदळे,डॉ.जगदीश सांगवीकर,विशाल शिंदे, अनिल काळोखे, , एमओयु समन्वयक पुनम गुंजवटे, अक्षय भोसले, , वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम, अक्षय शिंदे,कांचन खिरे यांनी मोलाचे योगदान दिले.