महा आवाज News

सामाजिक बहूउद्देशीय संस्था ( रजि) NGO तर्फ विदर्भीय पदधिकारी, यांची समविचारी बैठक संपन्न

प्रतिनिधी :सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
आटपाडी: यवतमाळ येथे मंगळवार दि.27 ऑगस्ट 2024, दुपारी 4 वाजता, शासकीय विश्राम गृह मध्ये प्रबुध्द सामाजिक बहूउद्देशीय संस्था ( रजि) NGO तर्फ विदर्भीय पदधिकारी, यांची समविचारी बैठक संपन्न झाली.
     या बैठकीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य आनंदराज वानखेडे सर, तसेच विदर्भप्रांत अध्यक्ष संदीप राऊत, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शैलेद्र बारसागडे,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशोकजी कदम, यवतमाळ जिल्हा संघटक सुहास नगराळे,मा.तूकोजी फूलझेले चंद्रपूर, आयुष्यमानिनी संगिता फुलझेले मॅडम चंद्रपूर  इ. पदाधिकारी यांची उपस्थित होते.
यावेळी प्रबुध्द सामाजिक बहूउद्देशीय संस्था (रजि.) NGO यांच्या कमिटिमध्ये नवनियुक्ती पदधिकारी यांच्या निवडी पार पडल्या.या नूतन पदाधिकारी  मान्यवरांचे सर्वांनी हार्दिक स्वागत केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
       या बैठकीत संस्थेचे उध्दिष्टे, नियम, 25 वर्षाची आतापर्यतची वाटचाल यांची माहिती प्राचार्य आनंदराज वानखेडे यांनी दिली. तसेच पूढील वर्षाचे संस्थेची दिनदर्शिका (कॅलेन्डर)  छापणे,संस्थेची वधू वरांची मॅरेज डीजीटल फोटो असलेली पुस्तिका छापणे, यांची माहिती दीली, तसेच महाराष्ट्रात संस्थेची प्रत्येक जिल्हात कमिठी तयार करण्यां बाबत, व समुपदेशक तयार करण्यां बाबत सर्वाची सामुदाईक चर्चा झाली. याप्रसंगी प्रत्येकाने आपआपली मते व विचार मांडले.
 अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणांत, व आनंदात आजची बैठक संपन्न झाली
चौकट:
प्रबुध्द सामाजिक बहूउद्देशीय संस्था (रजि.) NGO यांच्या कमिटि वर आज नवनियुक्ती झालेले पदधिकारी पुढील प्रमाणे :
मा. अरविंद शेनू कुंवर
( मा. उपनगराध्यक्ष शहादा नगरपालिका )
रा. शहादा, जिल्हा नंदुरबार.
महाराष्ट्र राज्य उपसचिव.
मा. दिनेश सारंग मेश्राम.
रा. बोरचांदली, पो. राजगड,
जिल्हा चंद्रपूर.
चंद्रपूर जिल्हा सचिव.
 मा. सुहास नभाजी नगराळे.
रा. सगनापूर, जिल्हा यवतमाळ.
यवतमाळ जिल्हा संघटक .
मा. अशोक योगाजी कदम.
रा. भिमनगर पुसद.
जिल्हा यवतमाळ.
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष.

इतरांना शेअर करा