हर्षवर्धनजी पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने इंदापूर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन.
– 109 रक्त बाटल्यांचे संकलन
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयातील क्रीडा संकुल या ठिकाणी हर्षवर्धनजी पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनानुसार उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे व विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर आणि मान्यवर युवकांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी युवक, युवती तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले.
युवा नेते राजेंद्र पवार म्हणाले की,’ आमच्या सर्वांचे लाडके नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून तसेच युवा नेते राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.’
युवा नेते बबलूभैय्या पठाण म्हणाले की,’ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दरवर्षी आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असा विधायक उपक्रम राबवत असतो.
यावेळी युवा नेते तुषार खराडे , सागर गानबोटे , अमोलराजे इंगळे , मयूर शिंदे , दत्तू पांढरे , दादा पिसे , बाळासाहेब भोंगळे , मयूर देवकर , अतुल वाघमोडे, अमोल राऊत , अजित करळे ,बापू पारेकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.