महा आवाज News

बदलापूर येथे घडलेल्या घटनेने आटपाडीत निषेध

प्रतिनिधी :सुधीर पाटील
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यातील सर्व शाळा, महाविदयालय, वस्तीगृहे या ठिकाणी आपल्या विभागाच्या माध्यमातुन मुलींच्या सुरक्षेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबतचे पत्र आटपाडी पोलीस निरीक्षक बहिर साहेब यांना देण्यात आले
आटपाडी /प्रतिनिधी
आटपाडी:दि. २३ रोजी आटपाडीत बदलापूर येथे नीच नराधमाने छोटया चिमुकलीवर जो अत्याचार केला, त्या घटनेने वाडी,वस्तीपासून म्हणजेच चांदयापासून बांदयापर्यंत समाजात हळहळ व्यक्त तर होतेच पण काळीज पिळवटून जाते. समाजसेवक संभाजी शेठ पाटील तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद सांगली संघटनेकडून  या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
         आटपाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मानवाने मानवावर असा अत्याचार होऊ नये म्हणून उपाय योजना करावी. शाळा, कॉलेजला येणाऱ्या मुली व त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आणून रोड रोमिओ बिनधास्तपणे मुलींना छेडतात असे बऱ्याच वेळा घडले आहे. ठिक ठिकाणी,गावोगावी दरारोज पोलिसांचे पथक फिरले पाहिजे ज्यामुळे या उनाडटप्पु विकृतांना चाप बसेल आणि सुरक्षितता वाटेल, पोलिसी यंत्रणावर आमचा पूर्ण विश्वास आहेच.
          त्याचबरोबर भर दिवसा कलकत्त्यात महिला डॉक्टरवर बलात्कार होतो म्हणजे समाजातील नपुंसक सरकार आणि पक्ष, पार्टी काय करतात..? चौकशी न करता यांना कठोर शिक्षा करून फाशी झाली पाहिजे. अशा घटना वारंवार घडत आहेत. आराजकता माजत आहे आणि आपण गुलाम बनून हे विनाकारणं सहन का करतो. समाजात संताप व्यक्त केला जात आहे. समाजातील जनता अशा नराधमांच्या कृत्यांना वैतागलेली आहे. यावर कायमस्वरूपी शासनाने कडक कारवाईचे नियम केले  पाहिजेत .
    त्याचबरोबर कोल्हापूर येथील घटना अतिशय मन सुन्न करणारी असून या सर्व घटनांचा संभाजी पाटील व समाजाकडून तीव्र निषेध करतो आहे.
     माझी आपणांस विनंती आहे की, आपण सजगता बाळगून आपल्या विधानसभा मतदार संघात अशा घटना काधीही घडू देऊ नयेत हि नम्र विनंती करण्यात आली.
 आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

इतरांना शेअर करा