महा आवाज News

अहिल्यारत्न पुरस्कार’ अंकिता पाटील ठाकरे यांना प्रदान, सामाजिक कार्याबद्दल गौरव

अंकिता पाटील ठाकरे यांना ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ प्रदान, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान*

प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :- 9373004029..

हिंदू समाज व मल्हार क्लब बारामती यांच्या वतीने पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणार ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ 2024 हा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या सदस्या, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. हा सोहळा बारामती येथील नटराज नाट्य कला मंदिर येथे संपन्न झाला.


सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असलेल्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये अंकिता पाटील ठाकरे यांचे सामाजिक योगदान बघून हा गौरव करण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते, माय होम इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवधर, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, पुणे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्षा वासुदेवनाना काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की, हा एक मोठा सन्मान असून, यामुळे येणाऱ्या काळात देखील समाजसेवेचे काम करण्यासाठी एक वेगळीच उर्जा मिळणार आहे. पिढ्यांनपिढ्या समाजसेवेचे हे व्रत आजही अखंड सुरू आहे. आणि हे पुढेही सुरूच राहणार आहे.

आपल्या समाजरत्नांनी जी शिकवण आपल्याला दिली आहे, तीच आपल्याला येणाऱ्या पिढीला देखील देयची आहे, ते आपलं कर्तव्य आहे. यामुळे ते आपल्याला चोखपणे पार पाडायचं आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अॅड. गोविंद देवकाते, सकल हिंदू समाज व मल्हार क्लब बारामती यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

इतरांना शेअर करा