प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
उपविभागीय दंडाधिकारी बारामती या कार्यालय मध्ये शिवराय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले माध्यमातून अनेक दाखले देण्याचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी यांच्या बालनात बारामती येथे आयोजित करण्यात आला होता
नामदेव भोसले यांच्या प्रयत्नातून राज्यातील 90 हजार पीडित कुटुंबाला कलंकित जीवनातून बाहेर काढून त्यांना स्वाभिमानाने गाव व्यवस्थेत न्याय मिळवून देण्याचे चांगले काम करत असल्याचे वक्तव्य नारवडकर यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय वस्तू व दप्तर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बारामती उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सुदर्शन राठोड व बारामतीचे तहसीलदार शिंदे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी मित्र व महसूल विभागाच्या सर्व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.