प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे शनिवार दिनांक 27/ 07/2024 रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील एस.वाय.बी एस सी च्या विद्यार्थिनी श्रद्धा वाघमारे व दिक्षा मिसाळ यांनी ‘अग्नी-5’ या क्षेपणास्त्राची प्रतिकृती सादर केली होती.
आज दिनांक 31/07/ 2024 रोजी ही प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, पुणे अंकिता पाटील-ठाकरे यांच्या समोर प्रात्यक्षिक सादर केले.
श्रद्धा वाघमारे हिने अग्नी-5 क्षेपणास्त्राबद्दलची सखोल माहिती सांगितली तसेच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले ‘अग्निपंख’ पुस्तक भेट देण्यात आले.
अंकिताताई यांनी विद्यार्थिनींच्या पाठीवर शब्बासकीची थाप देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयात राबवले जाणाऱ्या कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, तसेच भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. विरेश होळकुंदे उपस्थित होते .