महा आवाज News

मुलींना १००% शिक्षण मोफत देण्याचे शासन निर्णया (GR) ची काटेकोर अंमलबजावणी करा.

संजय भूपाल कांबळे
जिल्हा संपर्कप्रमुख
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांची मागणी ….

प्रतिनिधी:- सुधीर पाटील ..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..

सांगली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी, सांगली यांची भेट घेऊन, मुलींना १००% शिक्षण मोफत देण्याचे शासन निर्णया (GR) ची काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी लेखी निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात मोठ्या संख्येने कामगार वर्ग आहे. श्रमिक,कष्टकरी कामगार यांची परिस्थिती दयनीय असते त्यांना पडेल ते काम करून आलेल्या पैशातून आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करावे लागते. याचबरोबर मुलांचे शैक्षणिक खर्च मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहेत हा खर्च नपरवडणारा आहे .

गोरगरीब कुटुंबातील मुली शिकायला पाहिजेत शिक्षणा पासून वंचित रहायला नकोत तसेच मुलींना उत्तम दर्जाचे मोफत शिक्षण कसे घेता येईल यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी निर्णय घेऊन दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णय नुसार शासकीय महाविद्यालये, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत व त्यांच्या कुटुंबांतील वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना शैक्षणिक व परिक्षा शुल्क १०० % माफ करण्यात आल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय महाविद्यालये, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व तंत्रनिकेतन / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे.(खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) तसेच सार्वजनिक विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process- CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थिनीपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींचे शैक्षणिक शुल्क आणि परिक्षा शुल्क घेण्यात येऊ नयेत. जर विद्यापीठ महाविद्यालयांनी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सुचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसे स्थानिक वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे.

असे असतानाही या कल्याणकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यात होतानाचे दिसत नाही, सांगली जिल्ह्यातील बरेचसे शैक्षणिक संस्था ह्या गोरगरीब श्रमिक कष्ट करणाऱ्या कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या कडून शैक्षणिक शुल्क परीक्षेची मागणी करीत आहेत. पैसे न भरल्यास तासाला बसून दिले जाणार नाही.


तसेच परीक्षेलाही बसून दिले जाणार नाही असे संस्था चालकाकडून विद्यार्थिनींना बोलले जात आहे . मुलींना शिक्षण १०० टक्के मोफत असल्याचा शासन निर्णय झाला असल्यास कळवले असता संस्थेकडून सांगितले जाते की आम्हाला कोणतेही प्रकारचे शासकीय आदेश प्राप्त झाला नाही, यामुळे पालकांना व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शैक्षणिक फी भरावे असे सूचना करण्यात येत आहे . शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक विद्यार्थिनी निराश झालेले आहेत.

शासनाने कल्याणकारी निर्णय घेतला असून देखील गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी,आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे .
यामुळे मुलींसाठी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीत्तर आणि इतर व्यावसायिक शिक्षण १००% मोफत देण्याचे शासन निर्णया (GR) ची ताबडतोब अंमलबजावणी करावी या बाबतीत आपले लिखीत स्वरुपात आदेश सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थेला देण्यात यावेत.

शासन आदेश असतानाही शिक्षण फी माफी न करणाऱ्या महाविद्यालयावर कडक कारवाई करण्यासाठी आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यांनी निर्माण केलेली, श्रमिक, कष्टकरी कामगार कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या मार्फत, शिक्षण या पवित्र नावाने पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक व लूट करणाऱ्या या ‘शिक्षण माफीया’ विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे ‌यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी.

असा कडक इशारा देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र राज्य महासचिव प्रशांत वाघमारे साहेब, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, रमेश पवार, जयकर काळे, विष्णू वाघमारे, संदिप कांबळे यांच्या बरोबर कामगार, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा