महा आवाज News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून पात्र महिला वंचित राहू नये – अंकिता पाटील ठाकरे..

रेडणी येथे अर्ज नोंदणी अभियानाचा शुभारंभ..
 प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
         
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार प्राप्त होणार असून, या योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, असे आवाहन पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी रेडणी (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (दि. 18) केले आहे.
   
राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सुचनेनुसार रेडणी गावामध्ये आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी होणेसाठी मोफत अर्ज नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी अंकिता पाटील ठाकरे बोलत होत्या.
महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होणेसाठी सदरचे अर्ज नोंदणी अभियान उपयुक्त असल्याचे प्रतिपादन भाषणात अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.
     यावेळी ग्रा. पं. च्या सरपंच हिराबाई खाडे, उपसरपंच सुभाष शिर्के, प्रफुल्ल चव्हाण, स्वाधीन खाडे, कोमल लोंढे, सविता सोनटक्के, पुष्पा काळकुटे, शहाजी तरंगे, भाऊसाहेब काळकुटे, सुरेश खाडे, प्रकाश शेडगे, माऊली हाके आदिसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

इतरांना शेअर करा