प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
विद्यानगरी बारामती विद्या प्रतिष्ठान मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिवस मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योगदिवसाचे औचित्य साधून विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य मैदानावर विद्या प्रतिष्ठान व एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी योगा आणि प्राणायाम शिबिराचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.
डॉ अजिनाथ खरात व डॉ लोंढे यांनी प्राणायाम व विविध योगासने यांचे उपस्थित योगसाधकांना महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी हसतखेळत उत्कृष्ट मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी बैठक व दंड स्थितीतील विविध आसने करून घेतली, व त्या आसनांचे आपणास होणारे फायदे किती महत्त्वाचे आहेत हे पटवून सांगितले. त्याबरोबरच त्यांनी ओंकार, प्रार्थना यासह छान प्रात्यक्षिके घेतली. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी स्वास्थ्य जपण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगा व प्राणायाम यांचा अवलंब आपल्या जीवनात केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बारामती हेल्थ या संघटनेच्या सदस्यांनी यामध्ये प्रात्यक्षिके करून आपला सहभाग नोंदविला होता.
संस्थेच्या विश्वस्त व एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार यांनी या शिबिरात सहभागी होऊन उपस्थितांची मने जिंकली. त्यांची नुकतीच राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे त्या निमित्ताने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सदस्य डॉ राजीव शहा यांच्या हस्ते यथोचित सत्कार केला. डॉ अजिनाथ खरात, डॉ लोंढे, व व्यासपीठावर उपस्थित योगसाधकांचा संस्थेच्या वतीने सौ. सुनेत्रा पवार यांनी सत्कार केला. याप्रसंगी कर्नल श्रीष कंबोज, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे डॉ राजकुमार बिचकर डॉ. अतुल शहाणे डॉ आनंद देशमुख डॉ संगिता गायकवाड इ. तसेच सर्वं शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात एक हजार पेक्षा जास्त शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी सहभागी झाले होते.