महा आवाज News

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..!

सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी मुंबई :24 लालबाग, मुंबई येथे क्रीडा भारती मुंबादेवी भाग व मुंबई महानगर पालिका ई- वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनाचे औचित्य साधून ५० महिला व १० पुरुष यांच्या उपस्थितीत आणि क्रीडा भारती विभाग कार्यवाह श्री. प्रताप परब यांच्या नियोजनाखाली योग वर्गाचा व दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सत्कार करण्यात आला. याप्रसंगी योगवर्ग शिक्षीका सौ. शितल पिंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून योग करून घेतले तसेच डॉ. प्रागजी वाझा यांनी विद्यार्थ्याना योगाचे शारीरिक महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर प्रणाली लाड, सुरेखा सुर्वे, सौ. शिल्पा पवार, अनिल तोरसकर, मंगेश तावडे, रूपेश पवार, साहेबराव पोवाडे, तृप्ती पवार आदी मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना पारितोषिके प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा भारती विभाग कार्यवाह प्रताप परब यांनी सर्वांचे आभार मानले. केले.

इतरांना शेअर करा