महा आवाज News

कृषी सिंचनासाठीची पाणीपट्टी वाढ मागे घ्यावी – हर्षवर्धन पाटील- जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र …

प्रतिनिधी:-पल्लावी चांदगुडे 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..                   
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) दि.29 मार्च 2022 रोजी आदेश जारी करून कृषी सिंचनासाठी पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे. सदरची पाणीपट्टीमध्ये केलेली वाढ राज्य शासनाने मागे घ्यावी, अशा मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत शनिवारी दि. 21 दिले.
जलसंपदा विभागाकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव तयार कारण्यात आला होता.
त्या प्रस्तावास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मार्च 2022 मध्ये मान्यता दिली. मात्र सदरची करण्यात आलेली मोठी दरवाढ शेतकरी वर्गावर अन्यायकारक अशी आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सदर पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, पाणीपट्टी दरवाढी संदर्भात राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय निश्चितपणे घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांचेशी बोलताना स्पष्टपणे नमूद केले.

इतरांना शेअर करा