प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यादिप या नियतकालिकास विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अव्यावसायिक विभागातून दोन पुरस्कार मिळाले.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी पुणे ग्रामीण स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला त्या बद्दल सन्मानपत्र, ट्राॅफी आणि रुपये ७०००चा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी पुणे विद्यापीठ स्तरावरील प्रथम क्रमांक देऊन सन्मानपत्र, ट्राॅफी आणि रुपये १५०००चा धनादेश देऊन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विजय खरे व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते सन्मानपुर्वक गौरविण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे व कार्यकारी संपादक डॉ. आनंद गांगुर्डे व डॉ. संजय खिलारे, तसेच संपादक मंडळाचे सदस्य प्रा विजय काकडे, डॉ. अमर भोसले डॉ. श्रीराम गडकर प्रा. नीलीमा पेंढारकर डॉ. जयश्री चिमणपुरे डॉ राजेंद्र खैरनार डॉ. उत्कर्षा ठाकरे उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्रा. विजय काकडे यांना पुणे ग्रामीण विभागातील प्रभावी अंमलबजावणी करणारे विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. त्यांना सन्मानपत्र, ट्राॅफी आणि ५००० रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांची पुणे जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाचे नियतकालिक हे शैक्षणिक कामकाजाचा आरसा असतो त्याची योग्य ती दखल विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने घेऊन महाविद्यालयाचा गौरव केला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी केले.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार सचिव अँड नीलिमा गुजर विश्वस्त सौ सुनेत्रा पवार डॉ राजीव शहा श्री किरण गुजर श्री मंदार सिकची व रजिस्ट्रार कर्नल श्रीष कंबोज यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे व संपूर्ण संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले.