संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
बारामती शहर व बारामती पंचक्रोशी 315 कॅमेरा ची नजर 24 तास राहणार आहे. सध्या आचारसंहिते नंतर बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा चा प्रकल्प मार्गे लागणार असून या प्रकल्पाची निविदा आचारसंहितेनंतर निघणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीचा मर्यादित असलेला हा प्रकल्प व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून जवळपास 28 कोटी रुपये खर्चून बारामतीचा हा प्रकल्प निविदा स्तरावपर्यंत येऊन पोहोचला आहे बारामती कायदा आणि सुव्यवस्था या प्रकल्पानंतर अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पा मुळे बारामतीची कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यालयात होणार असून बारामती शहर बारामती तालुका व माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारामती शहराच्या विविध भागात 315 कॅमेरे बसविले जाणार असेल तर ते ठिकाणच्या हालचाली वरती 24 तास केलेल्या जन्मजात राहणार आहे.
या प्रकल्पामुळे मोटरसायकल चोरी, भांडे, सोनसाखळी चोरीसह अनेक गुन्हे करणारे गुन्हेगार या कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. नंबर प्लेट व दुचाकी वरील माणसांचा चेहरा अचूकपणे कैद करणारे कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसणार असल्याने पोलिसांना त्यांचा फायदा होणार आहे.
• बुलेट कॅमेरा संख्या 224
• कँटीलिव्हर कॅमेरा संख्या 40
• पीटीझेड कॅमेरा संख्या 56
• एएनपीआर कॅमेरा संख्या 35
• पब्लिक अँड्रेस सिस्टीम 31
• डिजीटल साईन बोर्ड 5
• पीटीझेड व व्हीटीएस कॅमेरा
पोलीस स्थानकासह नगरपालिकेतही याचा नियंत्रण उभारणार जाणार असून पोलीस एका जागेवर बसून वाहतुकी बाबत ॲड्रेस सिस्टीम वरून सूचना करून शकते. याचा फायदा प्रशासनाला बारामती तसेच बारामतीच्या आसपास असणाऱ्या नागरिकांना चांगलाच होणार आहे.