महा आवाज News

संभाजी ब्रिगेडचा विशालदादांना पाठिंबा*

प्रतिनिधी :   सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना संभाजी ब्रिगेड ने पाठिंबा दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष  श्रेयश नाईक म्हणाले की, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. संविधानामुळेच राबणाऱ्या बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि मानवी हक्क मिळाले आहेत. संविधानामुळेच नियोजन आयोग झाला, सिंचन प्रकल्प झाले, शेतापर्यंत पाणी, विज आले. सहकार मुळे प्रक्रिया उद्योग झाले.  हे संविधान भाजप नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मणीपुर, कुस्तीगीर महिला वरील अत्याचार, बलात्कार करणाऱ्यांना तुरुंगातून सोडून सत्कार केले जात आहेत. सांगली मतदारसंघातील शेतकरी, कामगार, बेरोजगार यांनी दिल्लीतील आंदोलने, अग्नीवीर लक्षात ठेवून मतदान करावे लागणार आहे.
जिल्ह्याच्या विकासाकरिता व सामाजिक शैक्षणिक आर्थिक बाबतीत या जिल्ह्याचा नावलौकिक व्हावे आणि जनतेवर हुकूमशाही पद्धतीने लादलेली भाजपाची उमेदवारी यांना पराभूत करण्याकरिता विशालदादा पाटील यांना संभाजी ब्रिगेड जिल्हा सांगली यांच्यातर्फे पाठिंबा जाहिर केला आहे.
यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे, सांगली महानगराध्यक्ष डॉ.कैलास पाटील,कडेगाव तालुकाअध्यक्ष सुरज महाडिक, कवठेमहांकाळ तालुकाअध्यक्ष सागर पाटील, जत तालुकाध्यक्ष दीपक पाटणकर,विटा शहराध्यक्ष सोहिल होनवाड, युवानेते अक्षय मोरे जत शहराध्यक्ष प्रमोद काटे, जत तालुकासचिव बजरंग शिंदे, तालुका कार्याध्यक्ष इर्शाद तांबोळी, रोहित चव्हाण,योगेश घाडगे उपस्थित होते.

इतरांना शेअर करा