महा आवाज News

विशाल पाटील यांची विटा शहरात पदयात्रेने प्रचाराची सांगता

प्रचारात आघाडी, पदयात्रेला मोठा प्रतिसाद
सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची विटा शहरात भव्य पदयात्रेने प्रचाराची सांगता झाली. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत तरुण नागरिक महिलांनी सहभाग घेतला.
अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून जत कवठेमंकाळ मिरज, पलूस, कडेगाव, सांगली शहर, तासगाव, खानापूर, आटपाडी या सर्व तालुक्यात त्यांच्या पदयात्रा प्रचार सभा आणि बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद तरुणांचा उत्साह आणि महिलांच्या साथीने विशाल दादांनी प्रचारात मुसंडी मारली.
विशालदादांच्या प्रचार सांगतेला सकाळी मिरजेत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर सायंकाळी विटा शहरात पदयात्रा काढण्यात आली.
प्रारंभी येथील भैरवनाथाचे दर्शन घेऊन पदयात्रेस सुरवात झाली. पदयात्रा भैरवनाथाच्या मंदिरापासून उभी पेठ, दगडी पाण्याची टाकी, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मायणी रस्ता,  लेंगरे रस्ता अशी काढण्यात आली. चौंडेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता झाली.
शहरात पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेदरम्यान विशाल पाटील यांनी चौकाचौकात नागरीकांच्या भेटी घेऊन आर्शिवाद घेतले. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. पदयात्रेत विटा शहरासह खानापूर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतरांना शेअर करा