महा आवाज News

जिल्ह्यातील शंभरहून अधिक संघटना विशालदादांच्या प्रचारात

वंचित आघाडी, मराठा स्वराज्य संघ, पुरोगामी कार्यकर्ते, दलित महासंघाचा सहभाग*
सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारात जिल्ह्यातील शंभरहून अधिक संघटना मैदानात उतरल्या आहेत. यात सामाजिक संघटनासह राजकीय पक्षांचाही समावेश आहे. परिणामी निवडणुकीत विशाल पाटील यांचे बळ वाढले असून या संघटनांनी त्यांच्या विजयासाठी रान उठविले आहे.
वंचित बहुजन आघाडीने विशालदादा पाटील यांना साथ दिली आहे. वंचित आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर प्रचारासाठी सांगली दौºयावर येणार आहेत. वंचित आघाडीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. जिल्ह्यातील पुरोगामी संघटनेचे कार्यकर्तेही विशाल दादाच्या पाठिशी आहेत. कॉ. धनाजी गुरव, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. संजय पाटील, सदाशिव मगदूम, राजू कांबळे आदिंसह सर्व कार्यकर्ते विशालदादांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचे राज्य अध्यक्ष सावळा बापू खुडे, जगन्नाथ खुडे, सुनंदा कदम, नियाज मुलाणी, मराठा स्वराज्य संघाचे राज्य अध्यक्ष महादेव साळुंखे यांनीही विशालदादा पाटील यांना साथ दिली आहे. मिरज शहर मराठा समाजही विशालदादांच्या पाठिशी आहे. सुदाम यादव हे प्रचारात सक्रीय झाले आहेत. दलित महासंघाचे उत्तम मोहिते, वनिता कांबळे, तात्यासाहेब देवकुळे, सलीम मुल्ला, प्रशांत केदार, महेश देवकुळे, अजित आवळे, डॉ. महावीर चंदनशिवे, सचिन मोरे,वनिता ठोकळे, विनोद कांबळे, राजू सनदी आदि कार्यकर्त्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
बंडखोर सेना पक्षाचे शिवाजीराव आवळे रवींद्र माळी व त्यांचे कार्यकर्ते, अन्याय विरोधक सेवा समिती, नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे बाळासाहेब शिरतोडे, रमेश नाईक व त्यांचे सहकारी, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे गिरीश सर्जे, परशुराम कोळी, झाशीची राणी ग्रामीण महिला विकास संघटना, आटपाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, समतावादी महासंघ, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, मिरज सुधार समिती, मातंग समाज समन्वय समिती, राष्ट्रीय बहुजन क्रांती दल, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जत तालुका मुस्लिम समाज , इपीएस पेन्शन कमिटी सांगली, जिल्हा राजपूत समाज आधीच विविध संघटना विशाल दादांना साथ देत प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.
विशालदादा पाटील यांना दिवेसदिवस विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ वाढतच चालले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचे बळ वाढले आहे.

इतरांना शेअर करा