कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, रॅलीतही सहभाग*
सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई शनिवारी सांगलीत येत आहे. सकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि विशाल दादांच्या सांगलीतील रॅलीत ते सहभागी होणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रॅली यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. विशाल दादांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते राजेंद्र गवई उद्या सांगलीत येत आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. शनिवारी विशालदादा पाटील यांची सांगलीत पदयात्रा आहे. या पदयात्रेत ते सहभागी होणार असल्याचे प्रभारी हेमंत भोसले जिल्हाध्यक्ष चौगुले यांनी सांगितले.