विशालदादाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी
सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची रविवार ५ मे रोजी मिरजेत सभा होणार आहे. त्यानिमित्ताने विशाल दादा समर्थकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विशाल दादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. याबाबत चे ट्विट वंचित आघाडीच्या एक्स हॅण्डल वरून करण्यात आले होते. तसेच वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील यांची भेट घेऊन पाठिंबाचे पत्र दिले होते.
विशाल दादा पाटील यांच्या प्रचारासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांची रविवार ५ मे रोजी सकाळी दहा वाजता मिरजेतील किसान चौकात सभा होणार आहे. या सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला असून नागरिकांसाठी आसन व्यवस्था केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री ताई पाटील, माजी महापौर किशोर जामदार, माजी नगरसेवक सुरेश आवटी, संजय मेंढे, शैलजा भाभी पाटील वहिदा नाईकवडी, अशोक कांबळे, वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते सोमनाथ साळुंखे, जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायकवाड, संघटक नितीन सोनवणे, संपर्कप्रमुख नजीर झारी, युवा प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे, जिल्हा महासचिव राजू मुलांनी जिल्हा सदस्य अपर्णा वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.